PSLVC-56

ISRO : चांद्रयान-3 नंतर इस्रोचं नवं मिशन! PSLV-C56 चं 30 जुलै रोजी होणार प्रक्षेपण

680 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो (ISRO) आता एका नवीन मोहीमेसाठी सज्ज झाले आहे. भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रो 30 जुलै रोजी 6 सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 मोहीम प्रक्षेपित करणार आहे. या मोहिमेसाठी इस्रो न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) चे सहकार्य घेणार आहे.

30 जुलै रोजी होणार प्रक्षेपण
इस्रो 30 जुलैला PSLV-C56 सह सहा सहप्रवासी उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रोने या संदर्भात माहिती दिली आहे. PSLV-C56 सह सहा सह-प्रवासी उपग्रह 30 जुलै रोजी सकाळी 06.30 वाजता प्रक्षेपित केले जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण पार पडणार आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

भारत आणि सिंगापूरची संयुक्त मोहीम
PSLV-C56 ही भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंधाना बळ देणारी मोहीम ठरणार आहे. DS-SAR उपग्रह सिंगापूर सरकारच्या अंतर्गत सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान एजन्सी (DSTA) आणि ST अभियांत्रिकी यांच्या भागीदारीमधून तयार करण्यात आला आहे. PSLV-C56 द्वारे सहा सह-प्रवासी उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत. या उपग्रहांमध्ये वेलॉक्स-एएम (Velox-AM), आर्केड (Arcade), स्कूब-II (Scoob-II), न्यूलायन (NewLion), गॅलासिया-2 (Galacia-2) आणि ओआरबी-12 स्ट्राइडर (ORB-12 Strider) यांचा समावेश आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!