India vs Pakistan

India vs Pakistan : ‘या’ कारणामुळे वर्ल्डकपमध्ये भारताला हरवणे पाकिस्तानसाठी आहे अशक्य

812 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला (India vs Pakistan) सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत. या वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्धही विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात आहे.

वर्ल्डकपमध्ये भारताला पराभूत करणं पाकिस्तानला अशक्य
भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले गेलेत. त्यापैकी टीम इंडियाने सर्व सात सामने जिंकले आहेत. भारताने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 या सातही वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव केला आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 134 वनडे सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 56 सामने जिंकलेत. तर पाकिस्तानने भारताविरुद्ध 73 वनडे सामने जिंकले आहेत. गेल्या 10 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला 7 वेळा पराभूत केलंय. तर पाकिस्तानने केवळ 2 सामने जिंकले आहेत. तर पावसामुळे एक सामना अनिर्णित राहिला. 2017 मध्ये पाकिस्तानने शेवटच्या वनडेत भारताचा पराभव केला होता. हा सामना ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा अंतिम सामना होता.

2023 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Share This News
error: Content is protected !!