नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातून (Cricket News) एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामध्ये वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटपटूचे निधन झाले आहे. त्यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. क्लाइड बट्स असे मृत पावलेल्या क्रिकेटपटूचे नाव आहे. ते वेस्ट इंडिजच्या निवड समितीचे अध्यक्षही झाले होते. शुक्रवारी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
Sad news out of Guyana.
Clyde Butts, the former Guyana captain and West Indies off-spinner; and former West Indies Chairman of Selectors passed away this evening
We offer sincere condolences to his family, friends and loved ones. May he Rest in Peace. pic.twitter.com/88QqKPZeR2
— Windies Cricket (@windiescricket) December 8, 2023
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने म्हटलं की, गुयानाचा माजी कर्णधार आणि वेस्ट इंडिजचे फिरकीपटू क्लाइड बट्स यांचे निधन झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
क्लाइड बट्स यांची कारकीर्द
क्लाइड बट्स 1980 च्या दशकात वेस्ट इंडिजच्या संघात होते. 1985 मध्ये कसोटीत पदार्पण केलं तर1988 मध्ये भारताविरुद्ध अखेरचा सामना खेळला. त्यांनी 7 कसोटी सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या. तर 108 धावाही केल्या होत्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 87 सामन्यात 348 विकेट घेतल्या होत्या. लिस्ट एच्या 32 सामन्यात क्लाइड बट्स यांनी 32 विकेट घेतल्या होत्या.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर
NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक
Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त
Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा
Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक
Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या