मुंबई : सध्या भारतात आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा सुरु आहे. या वर्ल्डकपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) 5 सामन्याची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. आगामी टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतला पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखानपट्टन या ठिकाणी खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी टीम ऑस्ट्रेलियाची घोषणा करण्यात आली आहे.
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान नोव्हेंबरदरम्यान सुरु होणाऱ्या या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली आहे. विकेटकिपर फलंदाज मॅथ्यू वेडकडे या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
दोन्ही संघाची कामगिरी
भारत आणि ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले. यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. टीम इंडियाने 13 सामने जिंकलेत तर ऑस्ट्रेलियाने 9 सामने जिंकेलत.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मॅथ्यू वेड (कर्णधार), स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, जेसन बेहरनडॉर्फ, सीन एबॉट, नाथन एलिस, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, तनवीर संघा, अॅडम झम्पा.