आज 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अशातच या सामन्यापूर्वी बीसीसीआयने एक मोठा बदल (Team India Jersey) केला आहे. यावेळी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल करण्यात आला आहे.
टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठा बदल
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाच्या जर्सीबाबत मोठी माहिती समोर आलीये. भारताच्या जर्सीत मोठा बदल करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हा बदल आशिया कपच्या जर्सीमध्ये नसून आशियाई क्रीडा म्हणजेच एशियन गेम्ससाठीचा आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी चीनला जाणार्या टीमच्या जर्सीमध्ये करण्यात आला आहे. एशियन गेम्समध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया नियमितपणे परिधान करत असलेली जर्सी घालणार नाही. तर यासाठी नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे.
एशियन गेम्ससाठी टीम इंडिया
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग.