#Commonwealth Games2022 : अविनाश साबळे यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर; ग्रामस्थांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

238 0

बीड – 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत बीड जिल्ह्यातील मांडवा गावच्या अविनाश साबळे याने 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. ही बातमी त्याच्या मूळ गावी मिळतात त्याच्या शेतकरी आई वडिलांचा आनंद पारावर उरला नाही. अविनाश बरोबरच त्याच्या आई-वडिलांवर त्याच्या गावी शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

मांडवा गावच्या सरपंच मनीषा मुटकुळे यांनी त्यांचे स्वागत करत पेढे भरून अविनाशच्या आईला उचलून घेतले. अविनाश मुळे मांडवा गावचं नाव जगभरात पोहोचल आहे. त्यामुळे हा आनंद ग्रामस्थांना देखील होतोय. अविनाशने अंतिम फेरीत आठ मिनिटे 11.20 सेकंदात शर्यत पूर्ण करीत राष्ट्रीय विक्रम नोंदविला. मात्र सुवर्णपदकासाठी त्याला वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी अपुरी पडली. अवघ्या 0.5 सेकंदाच्या अंतराने केनियाचा धावपटू अब्राहम किबिवोटने बाजी मारली आहे.

Share This News
error: Content is protected !!