Team India

Asia Cup 2023 : टीम इंडियाने श्रीलंकेला चितपट करत 8 व्यांदा पटकावला आशिया चषक

815 0

कोलंबो : आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) चा फायनल सामना खेळवला जात आहे. यामध्ये श्रीलंका संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. श्रीलंकेच्या सगळ्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर शरणागती पत्कारली आहे. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 50 धावा करून बाद झाला आहे.

श्रीलंकेच्या टीमकडून कुशल मेंडिस आणि दूषण हेमंता या दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला आहे. बाकी सगळ्या फलंदाजांनी अक्षरशः भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली आहेत. या सामन्यात मोहम्मद सिराजने 6, हार्दिक पंड्याने 3 आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली आहे.

या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाने एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला आहे. टीम इंडियाच्या शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाबरोबर टीम इंडियाने 8 व्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे.

Share This News
error: Content is protected !!