ASIA Cup

Asia Cup : भारत – पाकिस्तान लढतीची तारीख ठरली! 15 दिवसांत 3 वेळा येऊ शकतात आमनेसामने

657 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशिया कप 2023 (Asia Cup) ची तारीख निश्चित झाली आहे. पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. मात्र या स्पर्धेचे (Asia Cup) अजून वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात सामने खेळवण्याच्या ठिकाणावरून मोठा वाददेखील झाला होता. यानंतर यावर तोडगा काढत पीसीबीने दिलेल्या हायब्रीड मॉडेलवर स्पर्धेचं आयोजन केले आहे. आशिया कपमधील 4 सामने पाकिस्तानमध्ये तर 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. हे सामने 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

Asia Cup 2023 : भारतीय संघ जाहीर; आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

15 दिवसांत 3 वेळा येणार आमने- सामने
भारत आणि पाकिस्तान ग्रुप राउंडमध्ये 2 सप्टेंबरला आमने सामने येऊ शकतात. स्पर्धेत एकूण सहा संघ उतरणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ हे संघ आशिया कप खेळणार आहेत. यामध्ये तीन संघांचे दोन ग्रुप असतील. यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार आहेत. दोन्ही ग्रुपच्या टॉप दोन संघ सुपर 4 मध्ये जातील. सुपर 4 मध्ये गेल्यास भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा 10 सप्टेंबरला एकमेकांविरुद्ध लढू शकतात. दोन्ही सामने दांबुला या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे.

Asia Cup 2023 ची तारीख ठरली ! ‘या’ दोन देशांमध्ये खेळवली जाणार स्पर्धा

आशिया कपचे (Asia Cup) शेड्युल 19 जुलै रोजी जाहीर होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचले तर 17 सप्टेंबरला पुन्हा दोन्ही संघांमध्ये लढत होऊ शकते. यामुळे 15 दिवसात तीनदा दोन्ही संघ आमने सामने येऊ शकतात. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक यांच्यातील सामना अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!