मुंबई : बीसीसीआयने नुकताच Asia Cup 2023 साठी भारताचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. या आयपीएलमध्ये (IPL) रियान पराग, प्रभसिमरन सिंग, साई सुदर्शन, राजवर्धन हंगरगेकरसारख्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. त्यांना त्यांचे फळ मिळाले आहे.
भारताचा उदयोन्मुख संघ Asia Cup 2023 या स्पर्धेत सहभागी होणार आहे, ही स्पर्धा 13 ते 23 जुलै दरम्यान श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने ‘भारत अ ‘संघाची निवड केली आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडणार आहे. एका गटात भारत, नेपाळ, यूएई आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ओमान यांचा समावेश आहे.
Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंडाचे याअगोदर ‘6’ वेळा केले होते प्रयत्न
Asia Cup 2023 साठी भारतीय संघ
साई सुदर्शन, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, यश धुल (कर्णधार), रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), मानव सुथार, युवराजसिंह डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंग, नितीशकुमार रेड्डी, राजवर्धन हंगरगेकर.
राखीव खेळाडूंची यादी: हर्ष दुबे, नेहल वढेरा, स्नेल पटेल, मोहित रेडकर.
कोचिंग स्टाफ: सितांशु कोटक (मुख्य प्रशिक्षक), साईराज बहुतुले (गोलंदाजी प्रशिक्षक), मुनीष बाली (फिल्डिंग प्रशिक्षक).