ASIA Cup

Asia Cup 2023 : आशिया चषकातील सामन्याची वेळ ठरली ! कधी आणि कुठे होणार सामने?

995 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशिया चषक (Asia Cup 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला (Asia Cup 2023) सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आशिया चषकाचे वेळापत्रक जारी करण्यात आले होते. यंदाचा आशिया चषक एकदिवसीय स्वरुपामध्ये खेळवण्यात येणार आहे. आता सर्व सामन्यांच्या वेळा जाहीर करण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजल्यापासून खेळवले जाणार आहेत.

पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या सामन्याने आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाकिस्तानमधील मुल्तान मैदानावर रंगणार आहे. आशिया चषकात भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर 2023 रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना श्रीलंकामधील कँडी या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. 30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.

Asia Cup 2023

कुठे पाहाता येणार सामने?
31 ऑगस्टपासून आशिया चषकाला (Asia Cup 2023) सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!