Double Murder Case

Double Murder Case : दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला ! आधी बायकोची केली हत्या आणि नंतर चिमुकल्याचा जीव घेतला

14985 0

रत्नागिरी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे. सध्या रत्नागिरीमध्ये दुहेरी हत्याकांड (Double Murder Case) घडले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला (Double Murder Case) आहे. यामध्ये आरोपी पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि मग सहा वर्षांच्या चिमुकल्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे. या हत्याकांडा प्रकरणी संदेश रघुनाथ चांदिवडे (संशयित) रा. कोट पाष्टेवाडी, ता. लांजा या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
संदेश याने पत्नी सोनाली (26) हिची हत्या कोयत्याचे वार करून केली, तर प्रणव (6) या स्वतःच्या मुलाची हत्या गळा दाबून केली आहे. या घटनेचे माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तातडीने कारवाई करत आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन पथकांची नेमणूक केली होती. संदेशने अज्ञात कारणावरून आपली पत्नी सोनालीची आणि मुलगा प्रणव यांची निर्घृण हत्या केली. चिमुकल्या प्रणवची हत्या गळा आवळून किंवा नाक तोंड दाबून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी संदेशविरुद्ध पोलीस पाटलांनी फिर्याद दिली आहे.

या दुहेरी हत्याकांड प्रकरणी (Double Murder Case) संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. संशयित फरार आरोपी संदेश चांदिवडे हा वीजबिलांच्या मीटरचे रीडिंग घेण्याचे काम करत असे. या प्रकरणी पोलिसांनी घरामागील एका सड्यावर लपून बसलेल्या संदेशला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Related Post

Blast

Indian Army : भारतीय लष्कराची जम्मू – काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 5 दहशतवादी ठार

Posted by - November 17, 2023 0
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने (Indian Army) मोठी कारवाई केली आहे. भारतीय जवानांनी दहशतवादी ज्या ठिकाणी लपून बसले होते ते घर…
crime news

Nagpur Crime : नागपूर हादरलं ! सुनेला नडली आणि सासू जीवानिशी मुकली

Posted by - September 3, 2023 0
नागपूर : नागपूर (Nagpur Crime) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये सुनेने आपल्या 80 वर्षांच्या वृद्ध सासूची हत्या…

#HEALTH WEALTH : दीर्घायुष्यासाठी तासंतास नव्हे तर फक्त 11 मिनिटांची चाल पुरेशी ! फक्त चला असे…

Posted by - March 3, 2023 0
#HEALTH WEALTH : आपले आरोग्य राखण्यासाठी दररोज व्यायाम करणे किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया करणे खूप महत्वाचे आहे. धोकादायक आजार…
Nashik News

Nashik News : पत्नी अन् 13 महिन्यांच्या मुलाला वाऱ्यावर सोडत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 5, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या संसार अर्ध्यावर सोडून एका तरुणाने…
Jalna News

Jalna News : आजनंतर मी कोणाला भेटणार नाही… भावाला अखेरचा फोन केला अन्…

Posted by - October 11, 2023 0
जालना : जालन्यामध्ये (Jalna News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शहरातील मोती तलावामध्ये एका अठरा वर्षीय तरुणाने उडी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *