बहिरेपणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी तीन मार्च रोजी विश्व बहिरेपणा दिन पाळला जातो. त्याद्वारे बहिरेपणाबाबत समाजात जागृती करण्यात येते. सध्या हेडफोनसह कानातील इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम लगेचच दिसून येत नसले, तरी ते कालांतराने दिसून येतील असे तज्ञांचे मत आहे.
स्मार्टफोनच्या जमान्यात जास्त वेळ हेडफोन चा वापर करीत असाल तर तुम्हाला वेळेआधीच कर्णबधिरत्त्व येण्याचा धोका आहे. त्यामुळे त्याचा वापर कमीत कमी करावा असा सल्ला कान, नाक, घसातज्ञ देतात.
नवीन जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये अनुवंशिकता, गरोदरपणात आईला पहिल्या तीन महिन्यात संसर्ग झाल्यास किंवा चुकीची औषधे दिल्यास कर्णबधिरता येऊ शकते. आपण हेडफोन किंवा वायरलेस ब्लूटूथने बोलत असताना त्यातील इलेक्ट्रिक एनर्जी एअर प्लगद्वारे आपल्या कानात जाते.जे सातत्याने गाणे ऐकणे, बोलणे यासाठी या साधनांचा वापर करतात, त्यांच्या कानाच्या नसांवर त्याचा भार पडत असल्याने ते अकाली बधिर होण्याचाही धोका वाढला आहे.
तज्ञ सांगतात..
आवश्यकता नसताना हेडफोन वापरू नये
व्यावसायिक कारणाव्यतिरिक्त हेडफोनचा वापर नको
दररोज तासापेक्षा अधिक हेडफोन वापरणे टाळावे