रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय? 

188 0

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो.

परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय ? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो ? जाणून घेऊयात सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जरी केल्या जाणाऱ्या या अलर्ट्स बद्दल.

  • ग्रीन अलर्ट – कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे.
  • यलो अलर्ट – पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.
  • ऑरेंज अलर्ट – कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.
  • रेड अलर्ट – नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येते. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते
Share This News

Related Post

Pune Sadashiv

Pune Crime News : सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्यात नेमके काय घडलं?

Posted by - June 27, 2023 0
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. दर्शना पवार हत्याकांडाचं प्रकरण ताज असताना पुण्यातून (Pune Crime…
Satara News

Satara News : कराड तालुक्यातील वाघेरी येथे पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

Posted by - August 16, 2023 0
सातारा : कराड तालुक्यातील (Satara News) वाघेरी येथे एका संशयिताकडे भारतीय बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती सातारा (Satara News) स्थानिक गुन्हे…

दहावी बारावीचे निकाल जुनमध्येच लागणार, राज्य शिक्षण मंडळाची माहिती

Posted by - April 21, 2022 0
पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच जूनमध्ये लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे…
Truck Driver Strike

Truck Driver Strike : आंदोलनाचा इंधन पुरवठ्याला मोठा फटका

Posted by - January 2, 2024 0
पुणे : केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याला देशभरातील वाहनचालक संघटनांकडून (Truck Driver Strike) विरोध होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काल…
Heavy Rain

राज्यातील ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पाऊसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Posted by - May 5, 2023 0
पुणे : राज्यात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *