MARATHI RECIPE : झणझणीत ढाबा स्टाईल अंडा करी बनवा घरच्याघरी , सोपी पद्धत

570 0

साहित्य : 8 अंडी, 2 चमचे पांढरे व्हिनेगर, 2 टीस्पून तेल, 2 लसूण पाकळ्या, 1 इंच आले, 1 टीस्पून देगी लाल मिरची पावडर, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 टीस्पून धणे पावडर, हिरवी कोथिंबीर बारीक चिरून, आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार मीठ

कृती : सर्व प्रथम अंडी नेहमी प्रमाणे उकळवा. अंडी उकडल्यावर त्यांची साल सोलून काट्याने टोचून बाजूला ठेवा.
आता कढईत तेल टाकून गरम करा. आले, लसूण घालून परता. यानंतर कांदा घाला आणि पारदर्शक होईपर्यंत शिजवा. आता त्यात लाल तिखट घालून मिक्स करा. टोमॅटो आणि धणे पूड घाला आणि चांगले परतून घ्या. त्यात पाणी घालून झाकण ठेवून शिजवा.

टोमॅटो मऊ झाल्यावर मसाले थंड करा. त्यानंतर ब्लेंडरमध्ये बारीक करा. आता कढईत तेल टाकून गरम करा. त्यात अंडी घालून तळून घ्या. वरून लाल तिखट आणि मीठ घालून अंडी चांगली परतून घ्या.

पॅनमध्ये 1 वाटी पाणी गरम करून त्यात ग्राइंड केलेली ग्रेव्ही घालून शिजू द्या. चवीनुसार मीठ घालून शिजवा आणि नंतर अंडी घालून मिक्स करा. शेवटी कोथिंबीरीने सजवा. तुमची अंडा करी तयार आहे.

Share This News
error: Content is protected !!