Government Scheme

Government Scheme : गोष्ट तुमच्या कामाची माहिती शासकीय योजनांची; 399 रुपयांत कसा मिळवायचा 10 लाख रुपयांचा अपघाती विमा ?

717 0

160 वर्षापेक्षा अधिक काळापासून लोकांच्या विश्वासाचे आणि आपलेपणाचे नाते जपणाऱ्या भारतीय पोस्ट ऑफिस मार्फत 18 ते 65 वयोगटातील नागरिकांसाठी फक्त 399 रुपये मध्ये 10 लाखाचा अपघाती विमा चालू केला आहे.खरं तर हा अपघाती विमा TaTa AIG company chi आहे परंतू ती इंडियन पोस्टल पेमेंट बँकेच्या खातेदारकासाठी उपलब्ध करून दिला आहे. आजच्या या भागात आपण या विम्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया…

हा विमा कोण काढू शकतो?
18 ते 65 वर्ष दरम्यान कोणालाही हा विमा काढता येईल.
विमा काढण्यासाठी इंडियन पोस्टल पेमेंट बँकेत तुमचे डिजिटल अकाउंट असणे आवश्यक आहे जे तुम्ही कुठल्याही जवळच्या पोस्टात जाऊन 200 रुपये भरून काढू शकता.
विमा काढण्यासाठी केवळ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आवश्यक कुठल्याही जवळच्या पोस्टात जाऊन 10-15 मिनिटात तुम्ही हा विमा काढू शकता.
399 रुपये हे एका वर्षासाठी पुढील वर्षासाठी 399 भरून तुम्हाला तो रिनियु करावा लागेल.
*पोलीस, मिलिटरी, आदी अति जोखीम क्षेत्रातील व्यक्तींना हा विमा काढता येणार नाही.

विम्याची वैशिष्ट्ये
विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला मिळतात.
अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास, अवयव निकामी झाल्यास किंवा पैरेलेसिस झाल्यास विमाधारकास 10 लाख रुपये मिळतात.
विमाधारकांचा मृत्यू झाल्यास मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये मिळणार आहेत 2 पेक्षा अधिक मुलं असतील तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
60 हजारापर्यंतचा दवाखान्याचा खर्च देखील दिला जाणार आहे. घरीच उपचार केले तर 30 हजारापर्यंत आपण क्लेम करू शकतो.
दवाखान्याचा प्रवास खर्च 25000 दिला जाणार आहे.
विमा धारकारचा मृत्यू झाल्यास अंत्यसंसकारासाठी सुद्धा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत.
हा विमा अपघाती विमा असल्यामुळे नैसर्गिक मृत्यू नंतर याचे कोणतेही फायदे मिळत नाहीत. शिवाय अल्कोहल, सुसाईड या कैसेस मध्ये देखील हा विमा लागू होत नाही. अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा www.indiapost.gov.in यावर माहिती घेऊ शकता.

Share This News
error: Content is protected !!