उष्णतेची लाट नेमकी ठरवतात तरी कशी..? वाचा

480 0

सध्या उन्हाळा वाढू लागला आहे. भारतीय वेधशाळेकडून उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला जात असतो. ही उष्णतेची लाट कशावरून ठरवली जाते याबाबत अनेकांना कुतूहल असू शकते.

उष्णतेची लाट ही फक्त उकाडा किंवा उष्मा अधिक जाणवू लागला म्हणून घोषित होत नाही ज्या वेळी सामान्य भागातील तापमान 40 अंश सेल्सिअस आणि डोंगरी भागातील तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले जाऊ लागते त्यावेळी उष्णतेची लाट आली आहे असे समजले जाते. तापमान, आद्रता, दाब वाऱ्याचा वेग अशा गोष्टींवरून इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट अन्य बाबींची माहिती देत असते.

वेधशाळेकडून तापमानाचे एक दिवस ते तीन महिन्यांपर्यंत असे अंदाज घोषित केले जात असतात. उष्णतेच्या लाटेचे ही विविध प्रकार असतात ते हिरव्या, पिवळ्या, नारंगी आणि लाल रंगांनी दर्शविले जातात.

Share This News
error: Content is protected !!