महागाईपासून लोकांना वाचविण्याची गरज – राहुल गांधी

120 0

आगामी काळात महागाई आणखी वाढेल, असा इशारा काँग्रेस  नेते राहुल गांधी  यांनी शनिवारी जनतेला दिला आहे. सरकारने जनतेला महागाईपासून वाचवावे व तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, महागाई हा सर्व भारतीयांवर कर आहे, ज्यांच्या विक्रमी वाढीमुळे रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होण्यापूर्वीच गरीब आणि मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्क्यांच्या आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आणि कच्च्या तेलाच्या आणि खाद्येतर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे घाऊक किंमत-आधारित महागाई 13.11 टक्क्यांवर पोहोचली.

यापूर्वी पाच राज्यांमध्ये काॅंग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतरही राहुल यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी एफडी, पीपीएफ, ईपीएफ आणि महागाईशी संबंधित आपल्या ट्विटमध्ये जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, सरकारच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. FD – 5.1 टक्के, PPF – 7.1 टक्के, EPF – 8.1 टक्के, किरकोळ महागाई – 6.07 टक्के आणि घाऊक महागाई – 13.11 टक्के.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! कोरोनामुळे आशियायी क्रीडा स्पर्धा स्थगित

Posted by - May 6, 2022 0
बीजिंग- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या…

नवनीत राणा यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी : राणा यांच्या वकिलाची मागणी

Posted by - May 2, 2022 0
मुंबई- नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र पाठवून नवनीत राणा यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी…

वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर; पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी

Posted by - April 2, 2024 0
पुणे: वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाले असून यामध्ये पाच उमेदवारांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये पुण्यातून माजी नगरसेवक…

आजपर्यंतचा सर्वात भन्नाट व्हिडीओ : थेट जॉली एलएलबी-2 सारखी कॉपी, मुलं पास व्हावीत म्हणून पालकांनी अशी पोहोचवली उत्तर, पुढे काय होणार ?

Posted by - March 8, 2023 0
सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित तर व्हालच, पण तुमचे हसणे ही थांबवू…

मोठी बातमी ! अरविंद केजरीवाल यांना गुजरात उच्च न्यायालयाचा दणका ! या प्रकरणात ठोठावला 25 हजारांचा दंड

Posted by - March 31, 2023 0
गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची मागणी करणाऱ्या याचिकेवर निकाल दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *