एमआयएम महाविकास आघाडी सोबत येणार ? ; राज्यात राजकीय चर्चेला उधाण

109 0

राज्याच्या राजकारणात आता नव्या समिकरणांची जोरकस चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये आहे. हे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि असदुद्दीन औवैसी यांचा एमआयएम. होय, एमआयएम खासदार इम्तियाज जलील  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ही ऑफर दिली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

स्वत: खासदार जलील यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या भेटीत ही ऑफर दिल्याचेही जलील यांनी म्हटले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, माझ्या आईचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आले होते. त्यावेळी आमची विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी आम्ही त्यांना ऑफर दिली की, देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या. आमच्या ऑफरवर राजेश टोपे काहीच बोलले नाहीत, असेही जलील यांनी सांगितले. दरम्यान, आमच्यावर (एमआयएम) भाजपची बी टीम असल्याची नेहमीच टीका होते. आम्हाला ही टीका मान्य नाही. आम्ही थेट ऑफर देतो आम्ही तुमच्यासोबतही युती करायला तयार आहोत. आमच्यासोबत या. पण खरे सांगायचे तर प्रत्येकाला फक्त मुस्लिम मते आवश्यक आहेत. बाकी काही नको. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे, असेही जलील म्हणाले.

Share This News

Related Post

पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात

Posted by - July 5, 2022 0
पुणे: पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली असून  तब्बल १ कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमवल्याप्रकरणी पुणे महानगर पालीकेच्या उपायुक्तासह…

CHITRA WAGH : “संजय राठोड प्रकरणी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पूजा चव्हाणवर अन्याय झाला तेव्हा का आवाज उठवला नाही ? मी लढायचे कधीच सोडणार नाही…!”

Posted by - December 16, 2022 0
सांगली : सांगलीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. राठोड…

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

Posted by - June 3, 2022 0
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता  प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून…
Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime News : दोन महिलांच्या भांडणात कुत्र्याचा बळी; छ. संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Posted by - June 24, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन महिलांच्या भांडणात एका…
Bribe News

Bribe News : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; ‘एवढ्या’ रुपयांची स्वीकारली लाच

Posted by - February 29, 2024 0
धुळे : विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी 50 हजार रूपयांच्या लाचेची (Bribe News) मागणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *