आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जागावाटपा आधीच प्रचाराला सुरुवात केली असून, पक्षाकडून महाराष्ट्राच्या वॉर रूम प्रभारी पदाची जबाबदारी शशिकांत सेंथिल, यांच्याकडे सोपवली आहे.
देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, ज्यामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळालं असून राज्यात काँग्रेसने सर्वाधिक 13 जिंकल्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ ही दूर झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी करताना दिसून येत असून काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वॉर रूम प्रभारी पदाची जबाबदारी खासदार शशिकांत सेंथिल यांच्यावर सोपवली आहे.
काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने वॉर रूमच्या प्रभारीपदी शशिकांत सेंथिल यांची नियुक्ती केली.
पाहुयात कोण आहेत शशिकांत सेंथिल?
शशिकांत सेंथिल कर्नाटकमध्ये IAS अधिकारी म्हणून काम पाहिलंय
यूपीएससी परीक्षेत शशिकांत सेंथिल यांनी 9 वी रँक मिळवली होती
2019 मध्ये त्यांनी आयएएस पदाचा राजीनामा दिला
त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
2021 मध्ये शशिकांत सेंथिल यांच्यावर तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या सेंट्रल वाॅर रुमची जबाबदारी देण्यात आली
त्यावेळी शशिकांत सेंथिल यांच्या कामाने राहुल गांधी प्रभावित झाले होते.
राहुल गांधी यांच्या जवळील व्यक्तींमध्ये शशिकांत सेंथिल यांचा समावेश होतो
सध्या तमिळनाडूच्या तिरुवल्लूर लोकसभा मतदारसंघातून शिशिकांत सेंथिल हे खासदार आहेत
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वॉर रूमची जबाबदारी शशिकांत सेंथील यांना देण्यात आले, ते काँग्रेस पक्षाची प्रचाराची धुरा कशी सांभाळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.