Pimpari Chinchwad Crime

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी चिंचवड हादरलं ! मित्रांनी केली मित्राचीच हत्या

3649 0

पिंपरी : पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रांनीच आपल्या मित्राची हत्या केली आहे. मृत तरुणाने आई आणि बहिणी वरून अश्लील शिव्या दिल्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

काय घडले नेमके?
सुरज उर्फ जंजीर कांबळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पंकज पाचपिंडे, अमरदीप उर्फ लखन जोगदंड असे आरोपींची नावे आहेत. मृत सुरज कांबळे हा 7 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याच्या नातेवाईकांनी तो हरवला असल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, पोलिस आणि त्याचे कुटुंबीय त्याचे शोध घेत होते. अखेर 10 दिवसांनी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नाल्यात सापडला. त्याचा पंचनामा केला असता त्याची हत्या झाल्याचे समोर आले. यानंतर वाकड पोलिसांनी पथक तयार करत आरोपींचा शोध सुरू केला.

यादरम्यान तपास करताना सुरज कांबळे ज्या दिवशी बेपत्ता झाला त्या दिवशी सुरज सोबत पंकज पाचपिंडे आणि अमरदीप जोगदंड हे दारू प्यायला बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला. यानंतर त्यांची माहिती काढली असता ते दोघे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या शहरातून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघांना तेथे जाऊन सापळा रचून अटक केली. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली यानंतर पोलिसांनी आपला हिसका दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा मान्य केला.

Share This News

Related Post

VIDEO: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा संपन्न

Posted by - January 22, 2023 0
छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करण्यात यावा, धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विषयीकडक कायदे करावेत…

17 तासांच्या अज्ञातवासानंतर अजितदादा प्रकटले ! सर्वांचा एकच प्रश्न….एवढे तास कुठे होते ?

Posted by - April 8, 2023 0
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल दुपारी अचानक गायब झाले. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट…

मध्यप्रदेशातील चोरांनी हिंजवडीच्या लग्नसमारंभात चोरलेले दागिने मिळवण्यात पोलिसांना यश

Posted by - January 10, 2023 0
पुणे : मध्यप्रदेश राज्यांतील, राजगड जिल्ह्यातील , बोडा पोलीस स्टेशन हद्दीतील कडीयासांसी गावातील कुख्यात चोरांनी पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस…

राष्ट्रवादीची गुंडगिरी सहन करणार नाही; भाजपाचा इशारा

Posted by - May 15, 2022 0
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, वेळ आल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक…
Murder News

Murder News : पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून मेहुण्यांनी भावोजीला संपवलं अन्…

Posted by - August 6, 2023 0
कल्याण : मुलांना घेऊन जाताना दुसऱ्या पत्नीशी पतीने वाद घातला. याच वादातून तीन मेहुण्यांनी मिळून आपल्या दाजीची हातोडीने वार करून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *