पिंपरी-चिंचवडच्या ‘या’ नऊ भागांतील पाणी दूषित

794 0

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही जीबीएस आजाराचे रुग्ण वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात जीबीएस चे 17 संशयित रुग्ण आहेत. काहीजण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता पुन्हा पाठोपाठ पिंपरी चिंचवड मधील विविध भागांतील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यानुसार पिंपरी चिंचवड मधील तेरा भागांतील पाणी दूषित आढळून आले आहे.

दूषित पाणी आढळून आलेले परिसर खालील प्रमाणे :

१) थेरगाव
२) पिंपरी
३) काळेवाडी
४) अजमेरा
५) दिघी
६) ताथवडे
७) माेशी
८) भूमकर वस्ती
९) संत तुकारामनगर
१० ) आदी

या परिसरातील पाणी पिण्यास अयाेग्य असल्याचा अहवाल आला आहे. दूषित पाण्याद्वारे ‘जीबीएस’ची लागण हाेण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी निर्जंतुकीकरण केले जाते. विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंब करुनच शहरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारी ‘टीसीएल’ पावडर वापरण्यात येते. नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितलं आहे. भागातील पाणी दूषित आढळले आहे. त्या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. ‘ओटी साेल्यूशन’ टाकून पाणी तपासण्यात येणार आहे.

 

 

 

Share This News
error: Content is protected !!