संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवान गडावर; नामदेव शास्त्रीने दिले कुटुंबीयांना ‘हे’ आश्वासन

1093 0

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अद्यापही एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोकाका अंतर्गत कारवाई करण्यात आली. परंतु या सर्व प्रकरणावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यासाठी राज्यभर जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत.

तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर नामदेव शास्त्री महाराजांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे असं वक्तव्य केले. त्याच बरोबर आरोपींची मानसिकताही समजून घ्यायला हवी. असं वक्तव्य केले. नामदेव शास्त्री महाराज यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली.

नामदेव शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे भगवान गड असल्याचे जाहीर करून त्यांना पाठिंबा दिला.त्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी भगवान गडावर जाण्याचा निश्चय बोलून दाखवला. तसेच सर्व पुरावे महाराजांसमोर ठेवणार आहे आणि आता त्यांच्याकडे न्याय मागणार आहे, असा निर्धार बोलून दाखवला होता. त्यानुसार, संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर पोहोचले. धनंजय देशमुख यांनी महंत नामदेवशास्त्री यांच्यासमोर सगळी कागदपत्रे, पुरावे ठेवले. यावेळी नामदेवशास्त्री यांनी संतोष देशमुख कुटुंबाला शब्द दिला. त्याचबरोबर भगवानगड तुमच्या पाठीशी असल्याचा शब्द संतोष देशमुख कुटुंबियांना दिला.
धनंजय देशमुख यांच्यासह वैभवी देशमुख यांनी नामदेवशास्त्रींची भेट घेताना मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सगळ्यांसमोर धनंजय देशमुख यांनी थेटपणे नामदेवशास्त्रींसमोर पुरावे देताना त्यांची बाजू सांगितली. देशमुख कुटुंबाने कधी जातीवाद केला नाही. देशमुख कुटुंबियांची जमीन मुंडे कुटुंब दोन पिढ्यांपासून कसत आहे. प्रामाणिकपणे सांगतो. मनोहर मुंडेंचे चार मुले होती. दोन मुले पुण्यात होते. दोन मुले इथे. त्यांनी जे पिकवले ते आम्ही खातो. देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्याच्या हत्येनंतर दिसले असते. दलित बांधावाला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेले होते. असेही धनंजय देशमुख यावेळी बोलताना म्हणाले.आता धनंजय मुंडे यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख कुटुंबीयांचीही भूमिका समजून घेतली. त्यामुळे आता नामदेव शास्त्री महाराज नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

Share This News
error: Content is protected !!