पुणे : वारकरी बांधवांसाठी भोई प्रतिष्ठानच्या वतीने नेत्रदान प्रसार या विषयावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांचे नेत्रदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यामध्ये वारकरी बांधवांनी नेत्रदाना विषयी प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले व आपापल्या गावांमध्ये जाऊन या विषयावर जनजागृती करण्याचा संकल्प केला.
आपण गेल्यावर सुद्धा दोन अंध लोकांना दृष्टी मिळवून देण्याचे पुण्य आपल्याला मिळू शकते हा विचार म्हणजे खऱ्या अर्थाने पांडुरंगाची सेवा आहे असे मत वारकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी वारकरी बांधवांनी स्वतः नेत्रदान फॉर्म भरून संकल्प केला.पर्वती दर्शन येथील विठ्ठल रुक्माई मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी भोई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.