drowning hands

धक्कादायक ! कोरेगाव भीमा येथे भीमा नदीत दोन मुले बुडाली

1557 0

पुणे : पुण्यातील कोरेगाव भीमा नदीत (Bhima river) आज (दि.21) दुपारी दीडच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. हि दोन्ही मुले ढेरंगे वस्तीतील आहेत. गौरव गुरुलिंग स्वामी (वय 16), अनुराग विजय मांदळे (वय 16) अशी त्या मुलांची नावे आहेत.

काय घडले नेमके?
आज दुपारच्या सुमारास वस्तीवरील पाच ते सात मुले पोहण्यास गेली असता त्यातील ही दोन मुले पाण्यामध्ये अचानक दिसेनासे झाल्याने बाकी मुलांनी गावात जाऊन ग्रामस्थांना याची माहिती दिली. यानंतर गावातील सोन्या भोकरे, संपत भांडवलकर, बापू भांडवलकर, भाऊ अजगर, तानाजी ढेरंगे यांनी पाण्यात उतरून या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र ते दोघे कुठेच सापडले नाही.

यादरम्यान या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस (Shikrapur Police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस अंमलदार अमोल रासकर, मंगेश लांडगे आदी तर अग्निशमन दलाचे जवान व रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाले. दुपारी चारपासून अग्निशमन दलाचे जवान या मुलांचा शोध घेत आहेत मात्र त्यांचा अजून पत्ता लागलेला नाही.

Share This News
error: Content is protected !!