पुण्यात तृतीय पंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

552 0

पुणे- आंतरराष्ट्रीय तृतीय पंथील ओळख दिनानिमित्ताने तृतीय पंथीयांसाठी २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ या कालावधीत ‘तृतीय पंथीय मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जगभरात ३१ मार्च हा दिवस तृतीय पंथी ओळख दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं तृतीय पंथीयांची मतदार नोंदणी करताना त्यांच्याकडील कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने  त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. १८ ते २१ वर्षाच्या तृतीय पंथी नागरिकांकडे वयाचा पुरावा नसल्यास त्यांना गुरू माँ ने दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून  ग्राह्य धरण्यात येईल.

२१ वर्षावरील तृतीय पंथी व्यक्तीने स्वत:चे वय सांगणारे दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अधिकाधिक तृतीय पंथी व्यक्तींनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Share This News

Related Post

city of dreams

City Of Dreams 3 : बहुप्रतिक्षित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनचा टीझर आऊट

Posted by - May 12, 2023 0
मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याअगोदर या सीरिजचा धमाकेदार टीझर…

आत्महत्या की घातपात ? पाण्याच्या टँकर मध्ये आढळला महिलेचा मृतदेह; पुण्यातील हांडेवाडी परिसरात खळबळ

Posted by - June 20, 2024 0
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत नाही. पाण्याच्या टँकर मधून पाणी येत नसल्याने टँकरचे झाकण उघडून बघितल्यानंतर टँकर मध्ये चक्क…

PUNE POLICE : पुण्याचे सिंघम ! जो नागरिकांना नडला, त्याला पोलिसांनी तोडला !

Posted by - December 30, 2022 0
पुणे : याद राखा गुंडांनो, नागरिकांना नडाल तर पोलिसांकडून धू-धू धुतले जाल..! पुणे पोलीस आहेत हे पुणे पोलीस… त्यांच्या नादाला…

‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ राज ठाकरेंनी अशी कुणावर केली टीका

Posted by - May 22, 2022 0
  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत भोंग्यांसंदर्भातील विषय छेडला. जर मशिदींवर भोंगे लावले तर मशिदिंसमोर लाऊडस्पिकरवर हनुमान…
Arrest

माजी नगरसेवकाकडे खंडणी मागणाऱ्या तोतया पोलिसाला सापळा लावून अटक

Posted by - April 8, 2023 0
पुणे – वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाकडे २० लाखांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *