पुणेकरांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला ; कोणत्या धरणांत किती पाणीसाठा ? पाहा VIDEO

602 0

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांचा एकूण साठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळं पुणेकरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला आहे.

जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. चारही धरणांमधील पाणीसाठा किती टीएमसी आणि किती टक्क्यांपर्यंत झाला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया.प्रमुख धरणांमधील

पाणीसाठा TMC , टक्क्यांत
टेमघर            3.47 93.72
वरसगाव        12.82 100
पानशेत         10.65 100
खडकवासला 1.97 100
————————————————–
एकूण 28.92 99.02

आज सकाळपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत १३ हजार ९८१ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. टेमघर धरण क्षेत्रात ७० मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी ४१ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघ्या सहा मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.

आज सकाळपासून वरसगाव आणि पानशेत धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. वरसगाव धरणातून २९८५ क्युसेक, तर पानशेत धरणातून ४४८० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सकाळी नऊ वाजल्यापासून १३ हजार ९८१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणांच्या परिसरातील पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याच्या विसर्गात वाढ किंवा कपात करण्यात येईल, असे खडकवासला धरण साखळी प्रकल्पाचे सहायक अभियंता यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे १०० टक्के, तर टेमघर धरण ९३ टक्के भरले आहे. लवकरच टेमघर धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत जमा झाला झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.

Share This News
vaycasino Tipobet holiganbet galabet jojobet imajbet casibom jojobet marsbahis betsmove giriş pashagaming timebet jojobet holiganbet holiganbet marsbahis ultrabet betcio jojobet marsbahis casibom casibom casibom marsbahis
error: Content is protected !!