पुणेकर जनता या सरकारला नक्की धडा शिकवेल – भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक (व्हिडिओ)

496 0

5 फेब्रुवारी रोजी भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून पुणे महानगरपालिकेत धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यानंतर भाजपकडून किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर आता शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजपाच्या 300 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर मुळीक यांनी प्रतिक्रिया दिली असून
महाविकास आघाडी सरकारने भाजप कार्यकर्त्यांवर सुडाच्या भावनेतून कारवाई केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने विविध आंदोलने आणि मोठा जमाव जमवून जाहीर कार्यक्रम केले.

परंतु त्यांचावर कारवाई करण्यात आली नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर महापालिकेत प्राणघातक हल्ला करण्यात आला. परंतु गुन्हेगारांवर सौम्य कलमे लावून त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरल्याने सुडाच्या भावनेतून कारवाई करीत आहे. पुणे पोलिस सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप मुळीक यांनी केला.
या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. सरकारचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सातत्याने जनतेसमोर आणू. पुणेकर जनता या सरकारला नक्की धडा शिकवेल. असं देखील मुळीक म्हणाले

Share This News
error: Content is protected !!