पर्वती मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या विकास निधीतून व नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्णवेळ ऍम्ब्युलन्सचा (रुग्णवाहिकेचा) लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते विधानभवन येथे शनिवारी (ता. 13) संपन्न झाला.
याप्रसंगी नगरसेविका अश्विनी कदम म्हणाल्या पर्वती मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडणूक लढवली असताना पर्वती मतदार संघातील नागरिकांच्या उत्तम आरोग्य सुविधेच्या विषयी मी कायम प्रयत्नशील असते.
जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कोरोनाच्या प्रादुर्भावात लसीकरण,आरोग्य तपासणी शिबीर , राज्य स्तरावर नामाजलेले सुसज्य असे अल्प दरातील MRI सेंटर व त्यामध्ये एक्सरे,सर्व रक्त-लघवी चाचण्या व तसेच प्रभागात डोळे तपासणी ,विनामूल्य चष्मे वाटप,अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव देणे असे आरोग्य विषयक शिबीर घेत जास्तीत जास्त लोकांना कसा आरोग्याचा फायदा होईल यासाठी प्रयत्नशील राहिले आहे व पुढे ही राहील.
याचाच भाग म्हणून खूप पाठपुरावा करत पर्वती मतदार संघातील नागरिकांसाठी पूर्णवेळ ॲम्बुलन्स (रुग्णवाहिका) उपलब्ध केली.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सांगली जिल्हा परिषद गटनेते मा. शरद भाऊ लाड,विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ , महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी , युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. रविकांत वरपे, अमोल ननावरे, मा.विनीत मोकाशी, ऍड.प्रमोद गालिंदे, डॉ.सुनीता मोरे,फारुख शेख,संकेत शिंदे, सचिन समेळ,संग्राम वाडकर ,सचिन जमदाडे ,राहुल गुंड, अमोल पोतदार, प्रमोद कोठावळे, मंथन जागडे,महादेव जाधव ,सोमनाथ खंडाळे, प्रसाद खंडाळे, सौरभ ढावरे ,सुरज बनसोडे ,कृष्णा कोळी, मयूर शिंदे ,गणेश हनवते, यश नांदे, अरुण ढावरे ,योगेश लोंढे, अजय मिसाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.