पुणे : अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी कार्यरत अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक पोलिस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी अंमली पदार्थविरोधी कारवाई, टपालाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही यासाठीची दक्षता, खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता,व्यसनमुक्ति केंद्रांशी समन्वय,अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान,औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होता कामा नये.
याबाबत स्टोअर्सची नियमित तपासणी यासह विविध विषयावर चर्चा झाली. तपास यंत्रणांना आवश्यक प्रशिक्षण लवकरात लवकर आयोजित करण्याचेही निर्देशही श्री घाडगे यांनी दिले.
बैठकीस केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे महेश जगताप, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दिनेश खिंवसरा, उपसंचालक विजय कानडे, लोहमार्गचे पोलीस उप अधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर व श्री. विनायक गायकवाड यांनी समितीची कार्यपद्धती व कार्यवाहीची माहिती दिली.