राज्यभरातून पुण्यामध्ये MPSC, UPSC करण्यासाठी विद्यार्थी येत असतात. रात्रीचा दिवस करुन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असतात. परंतु या विद्यार्थांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न याच पुण्यामध्ये झाला आहे.
SAIM कट्टा पब्लिकेश हाऊसने विद्यार्थांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न केलाय. संबंधीत पल्बिकेशन हाऊस स्पर्धापरीक्षांसाठी पुस्तकं प्रकाशीत करते. ज्या पुस्तकावर विश्वास ठेवून विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असतात ती पुस्तकं एखाद्या अधिकाऱ्यांने लिहिलेली असतील असे भासवले जाते. परंतु इथे पुस्तकावर नाव असलेली व्यक्ती कुठल्याही पदावर नसून ती ऑफिस बॉय, तसेच बनावट लेखक असल्याचं उघड झाले आहे.