नीरा उजवा तसेच डाव्या कालव्यातून 30 जूनपर्यंत सलग दोन आवर्तने ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

131 0

नीरा प्रणालीअंतर्गत भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरण प्रकल्पात मिळून ३५.५३ टीएमसी पाणी शिल्लक असून ते गेल्यावर्षीपेक्षा १.७५ टीएमसी पाणी अधिक आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्यातून तसेच डाव्या कालव्यातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनाला जोडून अजून एक आर्वतन ३० जूनपर्यंत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालव्याची तसेच भामा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार सर्वश्री अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, समाधान आवताडे, सुनील शेळके, राम सातपुते, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे आदी उपस्थित होते.

नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर तसेच माळशिरस तालुक्यातील लाभक्षेत्राला मंजूर आरक्षणाप्रमाणे पाणी दिले जाईल. तसेच पाऊस सुरु व्हायला उशीर झाल्यास ३० जूननंतरही पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिली.

चासकमान प्रकल्पातूनही सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह दोन उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पवना प्रकल्पातही गतवर्षीप्रमाणे समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याने पिंपरी- चिंचवड शहराला पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार आहे, अशी माहिती यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या बैठकीस नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, खडकवासला पाटबंधारे विभागाचे विजय पाटील, नीरा डावा कालव्याचे बोडके, चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गुंजाळ आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Solapur News

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

Posted by - December 2, 2023 0
सोलापूर : सोलापूर पोलीस दलातून (Solapur News) एक खळबळजनक बातमी आली आहे. यामध्ये सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या…

निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूनं चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

Posted by - January 31, 2022 0
निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो हे खरं असलं तरी निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प…

Breaking News ! रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या तरुणाला मालाडमधून अटक

Posted by - June 2, 2022 0
पुणे- राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या तरुणाला फरासखाना पोलिसांनी मालाडमधून अटक केली आहे. सुधीर लाड असे…

संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या संशयिताच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती

Posted by - April 1, 2023 0
शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयित तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले…
Kolhapur Suicide

Kolhapur Suicide : प्रसिद्ध उद्योगपती आणि अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांची कुटुंबासह आत्महत्या

Posted by - June 24, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना (Kolhapur Suicide) घडली आहे. यामध्ये अल्पावधीत औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *