पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा अजूनही फरार आहे. या आरोपीविषयी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत त्याच्या बारा मित्रांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्याच्या शिरूर मधील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. अशात त्याच्या एका मैत्रिणीने खळबळजनक माहिती सांगितली आहे. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. या चौकशीतून आता आरोपी दत्तात्रय गाडेच आणखी एक कांड उघडकीस आल आहे. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार करण्यापूर्वी आरोपी त्याच्या एका मैत्रिणीचा छळ करत असल्याची माहिती समोर आली आहे.
नराधम आरोपी पीडित मैत्रिणीला सतत फोन आणि मेसेज करून त्रास देत होता. तिला सतत भेटायला बोलावत होता. याशिवाय तुझ्या मैत्रिणीसोबत ओळख करून दे, तिच्याशी पॅचअप करून दे, तिच्याशी सेटींग लाव, अशी मागणी आरोपी आपल्या मैत्रिणीकडे सातत्याने करत होता. पीडितेनं याला अनेकदा विरोध करूनही तो सतत तिला फोन आणि मेसेज करून त्रास देत होता. याबाबतचा खळबळजनक खुलासा आरोपीच्या मैत्रिणीनेच केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. त्याला एक मुलगा देखील आहे, असं असताना देखील आरोपीची इतर महिला आणि तरुणींवर वाईट नजर होती. तो आपल्या मैत्रीणीलाही त्रास द्यायचा. याच विकृतीतून त्याने मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात आलेल्या तरुणीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याचं सांगितलं जातंय. त्याला सापडण्यासाठी पुणे पोलिसांची 13 पथक तैनात आहेत. आरोपीला शोधून देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आल आहे. दरम्यान या आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.