What’s happening in PUNE: पुणे शहरात नेमकं चाललंय तरी काय ?

460 0

पुणे शहराची परिस्थिती बघता पुण्यातील गुन्हेगारी, अत्याचार व बलात्कार या घटनांत वाढ होत चालली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांना कायदा व सुव्यवस्था यांची काही भीती राहिली नाही ते समाजात खुलेआम हातात आयुधे घेवून वावरत आहेत.

पुणे तोडफोडीच्या घटना

लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड करणे वाहने जाळून टाकणे या घटनांमध्ये ही वाढ झाली आहे. या वर्षात दाखल झालेल्या 10 गुन्ह्यांमध्ये 7 गुन्हे उघडकीस आले असून, त्यामध्ये 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्वांत जास्त 28 तोडफोडीच्या घटना परिमंडल-5 मध्ये झाल्या आहेत. त्यामध्ये कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, हडपसर, वानवडी, लोणी काळभोर, काळेपडळ, फुरसुंगी, मुंढवा अशा पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ परिमंडल-4 मध्ये 23 तोडफोडीच्या घटना दाखल झाल्या आहेत. यात मुख्यत्वे करून चतुःशृंगी, बाणेर, येरवडा, चंदननगर, विमाननगर, खडकी, लोणीकंद, खराडी, वाघोली अशा पोलिस ठाण्यांचा सहभाग आहे. त्याखालोखाल परिमंडल-3 मध्ये 17 तोडफोडीचे गुन्हे दाखल झाले. यामध्ये कोथरूड, वारजे माळवाडी, डेक्कन, पर्वती, सिंहगड रोड, नांदेड सिटी, यांचा समावेश आहे.

25 टक्क्यांहून अधिक अल्पवयीन मुलांचा सहभाग

मागील वर्षी दाखल झालेल्या 83 गुन्ह्यांमध्ये 156 सज्ञान आरोपींचा सहभाग होता, तर या 83 गुन्ह्यांत सज्ञान आरोपींव्यतिरिक्त 52 अल्पवयीन आरोपींचा (विधिसंघर्षित बालकांचा) सहभाग आढळून आला आहे. अल्पवयीन मुलांचा सहभाग तोडफोडीच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये 25 टक्क्यांहून अधिक असल्याचे यानिमित्तही अधोरेखित झाले आहे. तसेच अल्पवयीन बालकांना अशा गुन्हेगारीपासून परावृत्त करणे हा देखील मोठा टास्क सर्वांसमोर निर्माण झाला आहे.

 

 

 

Share This News
error: Content is protected !!