पुण्यात स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा अजूनही फरार आहे. आरोपी दत्ता गाडी हा मूळचा शिरूर तालुक्यातील आहे. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी तेरा पथके तैनात केली आहेत. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. त्याला पकडून देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी एक लाखा रुपयांच बक्षीसही जाहीर केल आहे. अशात नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविषयी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपीचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. बलात्कार करणारा नराधम हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारचा कार्यकर्ता म्हणून मिरवत असल्याचं समोर आले आहे.
आरोपी दत्ता गाडे याचा फोटो शिरूरचे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या एका वाढदिवसाच्या बॅनर वर दिसून आला आहे. यासह आजी आमदार माऊली कटके यांच्या सोबतही नराधम दत्तात्रय गाडे याचा फोटो समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत दत्ता गाडे याने प्रचारासाठी काम केले होते. तो स्वतःला नेत्यांचा कार्यकर्ता म्हणवून घ्यायचा. तालुक्यातील लोकांना उज्जैन महाकाल दर्शनासाठी घेऊन जात असायचा. त्याच्यावर अनेक ठिकाणी चोरी दरोडे यांसारख्या गुन्ह्यांची शिरू, शिक्रापूर आणि पुणे पोलिसांत तक्रार दाखल आहे. 2024 मध्ये ही पुणे पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. 2019 पासून गाडे हा जामिनावर बाहेर आहे. अशात त्याच्याविषयी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान बॅनरवर त्याचे फोटो आढळून आल्याने नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिल आहे.
विद्यमान आमदार माऊली कटके काय म्हणाले?
आरोपी दत्ता गाडे याच्या व्हाट्सअप प्रोफाईलला फोटो शिरुरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना माऊली कटके म्हणाले, मतदार संघांतील 10 हजार पेक्षा जास्त लोकांना देवदर्शन करून मी आणलं आहे. अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढत असतात. माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा माझा संबंध नाही. कारण अनेक कार्यकर्ते मतदारसंघात सोबत फोटो काढत असतात. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत, असंही कटके यांनी म्हटले आहे