सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ आता स्वतंत्र इमारतीत

202 0

लहान व किशोरवयीन मुलामुलींना विज्ञानाची गोडी लागावी व कुतूहल निर्माण व्हावे या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१४ साली सुरू केलेल्या ‘सायन्स पार्क’चा आता अधिक विस्तार होणार आहे. ‘सायन्स पार्क’ च्या नव्या इमारतीचे उद्घाटन उद्या सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पद्मभूषण बाबा कल्याणी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी परसिस्टंट सिस्टीम कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक व कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद चौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, प्रतिष्ठित प्राध्यापक आणि सायन्स पार्कचे समन्वयक डॉ. दिलीप कान्हेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठातील ‘सेन्टर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकेशन’ म्हणजेच सायन्स पार्कची सुरुवात २०१४ साली करण्यात आली. जीवनशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आदी विषयांत तयार करण्यात आलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील माहिती देण्याबरोबरच विद्यापीठ परिसरात असणाऱ्या अनेक पर्यावरणविषयक घटकांची सफरही यावेळी घडविण्यात येते. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या सायन्स पार्क ला भेटी दिल्या आहेत अशी माहिती डॉ.कान्हेरे यांनी दिली.

याआधी तीन ते साडेतीन हजार चौरस फूट जागेत सुरू असणाऱ्या सायन्स पार्कला आता स्वतंत्र इमारतीत १५ हजार चौरस फूट जागा उपलब्ध झाली आहे. यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्र प्रयोगकक्षाबरोबरच चार स्वतंत्र प्रयोगकक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच विज्ञान विषयक माहितीपट दाखविण्यासाठी प्रक्षेपण कक्ष व अवकाश निरीक्षणासाठी दोन मोठ्या दुर्बिणीही उपलब्ध असल्याचे डॉ. कान्हेरे यांनी सांगितले.

Share This News

Related Post

वृत्तपत्रात बदनामीची धमकी; खंडणीची वसुली; महिला संपादकासह चौघा तोतया पत्रकारांना अटक

Posted by - October 26, 2022 0
पुणे : पाच लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या एका महिला संपादकासह तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्या गोदामामध्ये भेसळयुक्त…

पुण्यात रात्री बे रात्री टेरेसवर पब आणि डीजेवर गाणे लावून होते आहे नाच-गाणे; बेकायदा पबवर कारवाईसाठी शहर शिवसेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Posted by - March 23, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये अनेक ठिकाणी हॉटेलमध्येमध्ये मद्यविक्री आणि हुक्का सहज मिळतो. शौकिनांसाठी खास मेजवानी असते. पण काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत…

वनविभागाचा मोर्चा वळाला विशाळगडावर; ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

Posted by - December 9, 2022 0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष देणारे अनेक ऐतिहासिक गडकिल्ले महाराष्ट्रात आजही खंबीरपणे उभे आहेत. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूंवर…

10 मे ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी येथे होणार – खासदार रामदास आठवले

Posted by - January 25, 2023 0
पुणे : 10 मे रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष…

विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे : उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - September 24, 2022 0
पुणे : देशाने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर निवडलेल्या क्षेत्रात समर्पित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *