Sanjay-Matale

संजय माताळेंवर कौतुकाचा वर्षाव ! खडकवासला धरणात बुडणाऱ्या मुलींचे वाचवले होते प्राण

701 0

पुणे : काल पुण्यातील खडकवासला धरण (Khadakwasla Dam) परिसरात 9 मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी 7 मुली पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. यापैकी 5 जणींना वाचवण्यात यश आले तर दोन मुलींचा पाण्यात बुडून (drowning) मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना घडली तेव्हा गोऱ्हे खुर्द येथील 53 वर्षीय संजय सीताराम माताळे यांनी या पाच मुलींचा जीव वाचवण्याची कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

या सगळ्या प्रकरणाबद्दल संजय सीताराम माताळे (Sanjay Sitaram Matale) यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, घटनेच्या दिवशी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत सावडण्याचा विधी सुरू होता. त्यावेळी अचानक काही मुलींचा आरडाओरड ऐकण्यास मिळाला. त्यानंतर आम्ही सर्वजण धरणाच्या भिंतीजवळ गेलो असताना काही मुली बुडत असल्याचे दिसून आले.

यानंतर त्यांनी तातडीने धावत जाऊन पाण्यात उडी मारली. तोपर्यंत मुलींच्या नाका तोंडामध्ये पाणी गेल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यामुळे बाहेर काढणं कठीण झाले होते. पण एक एक करून पाच मुलींना काढून त्यांना सर्व मुलींना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र दुसऱ्या दोन जणींना वाचवण्यात त्यांना अपयश आले अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Share This News

Related Post

पुणे रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज

Posted by - May 13, 2022 0
पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली संशयास्पद वस्तू ही स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बॉम्ब शोधक नाशक…

40 व्या वर्षी MPSC उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिकाचे खा. सुळे यांच्याकडून कौतुक; लष्करात सतरा वर्षे सेवा करून आता जनतेची सेवा करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याचा गौरव

Posted by - January 17, 2023 0
दौंड : भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. पास…
MHADA

MHADA : म्हाडातर्फे आरामदायी व आधुनिक सुविधांनी सज्ज ‘ ईडन गार्डन’ गृहप्रकल्प सादर

Posted by - October 16, 2023 0
पुणे : आपलं स्वतःचे हक्काचे घर (MHADA) असावे, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असते. सामान्य माणसाचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने…

पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली ? नवा लेटर बॉंब

Posted by - May 6, 2022 0
पुणे- माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना…

पुण्यातील धक्कादायक घटना : पोलिस कर्मचा-याच्या डोक्यात दगड घालून केला जीवघेणा हल्ला, वाचा सविस्तर

Posted by - November 19, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये गस्त घालीत असताना एका पोलीस कर्मचा-याच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *