Samruddhi Mahamarga

समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार; कसा असणार प्रकल्प?

142 0

पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किलोमीटरचा सहा पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासंदर्भातला निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबई ते नागपूर या दोन शहरांना कनेक्ट करणारा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे.

या महामार्ग प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून जवळपास 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग सध्या वाहतुकीसाठी सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं.

Share This News
error: Content is protected !!