Crime

दारू पिऊन रस्त्यावर केला राडा, पोलिसालाही केली धक्काबुक्की; अभियंत्यासह भावाला अटक

67 0

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांना कसलाच धाक राहिलेला नाही. त्यामुळेच रस्त्यात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या संगणक अभियंत्याला समज देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. पुण्यातील घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर ही घटना घडली असून याप्रकरणी संगणक अभियंत्यासह त्याच्या भावाला वानवडी पोलिसांनी अटक केली.

याबाबत पोलीस कर्मचारी अनिकेत वाबळे यांनी फिर्याद दिली असून नयन शिवाजी भंडलकर (वय २५) आणि आशिष शिवाजी भंडलकर (वय २२, दोघे रा. कुंदन इटर्निया, बी. टी. कवडे रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर आणखी तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन‌ भंडलकर हा तरुण संगणक अभियंता आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बी. टी. कवडे रस्त्यावर रोझरी सोसायटीच्यासमोर काहीजण दारू पिऊन गोंधळ घालत होते. याची माहिती नागरिकांनी पोलीस कंट्रोल रूमला दिली. तात्काळ पोलीस कर्मचारी अनिकेत वाबळे यांच्यासह आणखी काही पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी आरोपी भंडलकर रस्त्यात उभा राहून आरडाओरडा करत होता. बावळे यांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भंडलकर आणि त्याच्या भावाने वाबळे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

त्यामुळे भंडलकर आणि त्याच्या भावावर सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी पुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्याबरोबर असलेले तीन मित्र पसार झाले आहेत. त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

नवाब मलिक आणखी दोन आठवडे तुरुंगातच!

Posted by - April 4, 2022 0
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे मलिक यांचा तुरुंगातील…

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

Posted by - April 13, 2023 0
पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी…
Mumbai News

Mumbai News : मंत्रालयामध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून वडापाव विक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : मुंबईतील मंत्रालयामधून एक धक्कादायक घटना (Mumbai News) समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून…
Sharad Pawar

Maharashtra Politics : शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; भाजपचा ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

Posted by - April 11, 2024 0
पुणे : सगळीकडे लोकसभेची धामधूम सुरु असताना आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपला…

Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर

Posted by - May 27, 2024 0
पुणे : पुण्यतील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने (Pune Porsche Car Accident) म्हणजेच वेदांत अग्रवालने रविवारी (19 मे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *