Pune News

Pune News : पुणे पोलिसांनी गुडलक कॅफेजवळ पाच कोटीं किंमतीची व्हेल माशाची उलटी केली जप्त

641 0

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune News) घटनांमध्ये रोज वाढ होताना दिसत आहे. आज पुणे पोलिसांनी (Pune News) मोठी कारवाई करत गुडलक कॅफेच्या मागे व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या व्हेल माशाच्या उलटीची किंमत तब्बल पाच कोटी रुपये आहे.

पुण्यातील गुडलक कॅफे हा फर्ग्यूसन रस्त्यावर आहे. या रस्त्यावर मोठी रहदारी असते. याच कॅफेच्या मागे एक व्यक्ती व्हेल माशाची उलटी गैरकायदेशिरित्या विक्री करत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. विश्वनाथ गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या बॅगमधून पाच कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे.

व्हेल माशाच्या उलटीला भारतात सोबतच विदेशातही मोठी मागणी आहे. भारतात व्हेल माशाच्या उलटीसाठी एक किलोसाठी 1 कोटी रुपये भाव आहे. तर परदेशात एका किलोसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची किंमत प्रतिकिलो 3 ते 4 कोटी एवढी आहे. व्हेल माशाच्या उलटीचा मोठा उपयोग होतो. त्यामुळेच या उलटीला मोठी किंमत आहे.

Share This News
error: Content is protected !!