सुवर्णमहोत्सवी वर्षात जनकल्याण समितीतर्फे ‘सेवा भवन’ची निर्मिती

107 0

पुणे- रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला रथसप्तमीच्या दिवशी (7 फेब्रुवारी 2022 ) प्रारंभ होत असून या वर्षात अनेकविध नवे सेवा प्रकल्प समितीतर्फ़े सुरु केले जाणार आहेत. या वर्षात जनकल्याण समितीतर्फे पुण्यातील एरंडवणे परिसरात ‘सेवा भवन’ ही वास्तू साकारणार आहे. अत्यल्प दरातील डायलिसीस केंद्र तसेच रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व भोजन व्यवस्था सेवा भवनमध्ये असेल.

जनकल्याण समितीचे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . समितीचे कार्यवाह तुकाराम नाईक यावेळी उपस्थित होते.

पुण्यात एरंडवणे – पटवर्धन बाग परिसरात ‘सेवा भवन’ ही आठ मजली वास्तू उभी केली जात आहे. त्यातील एका मजल्यावर पंधरा बेड्चे डायलिसीस सेंटर असेल . तसेच तीन मजल्यावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी छत्तीस खोल्या बांधल्या जाणार आहेत. तेथील भोजन व निवास व्यवस्था अत्यल्प दरात असेल. या वास्तूतील एका मजल्यावर जनकल्याण समितीचे निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची योजना आहे. वैद्यकीय समुपदेशन कक्षही चालवला जाणार आहे. ही आठ मजली इमारत एकोणतीस हजार चौरस फुटांची असेल .

सुवर्णमहोत्सवी वर्षात जनकल्याण समितीतर्फे विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत असलेल्या व्यक्ती तसेच संस्थांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्याचा प्रारंभ 7 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे अशी माहिती डॉ. रवींद्र साताळकर यांनी दिली.

Share This News

Related Post

ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या दुकानांमधून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Posted by - April 4, 2022 0
पुणे – ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
Nitin Desai

Nitin Desai : ‘मिट्टी से जुडे थे, मिट्टी के लिये लडे थे.. दिग्दर्शक नितीन देसाईंची ‘ती’ शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल

Posted by - August 2, 2023 0
मुंबई : आज सकाळच्या सुमारास सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी गळफास…

लोकांनी झिडकारलं फटकारलं ; अभिनेत्री हेमांगी कवीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत 

Posted by - March 8, 2022 0
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी कलाविश्वात सक्रीय असण्यासोबतच हेमांगी सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे समाजात घडणाऱ्या प्रत्येक…

आता कैद्यांनाही मिळणार कर्ज, येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्वावर योजना राबवणार

Posted by - March 30, 2022 0
मुंबई- कारागृहातील शिक्षाधीन बंदी यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज 7 टक्के…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *