Heavy Rain

पुणे, सातारा, पालघर जिल्हात पावसाचा रेड अलर्ट जारी; नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचं राहण्याचं आवाहन

1019 0

राज्यात विविध ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली असून हवामान विभाग राज्यभर पावसाचा अंदाज व्यक्त केला असून अनेक ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलंय.

पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होत असून या दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय. पालघर मध्ये मुसळधार पाऊस होत असून त्यामुळे पालघर मध्ये सुद्धा वेळ रेडअलर्ट जारी करण्यात आला.मुंबईमध्ये देखील आज पाऊस मुसळधार स्वरूपात हजेरी लावणार आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.

Share This News
error: Content is protected !!