Garwa Murder Case

Garwa Murder Case : गारवा मर्डर केस प्रकरणातील आरोपी बाळासाहेब खेडेकर याचा मृत्यू

623 0

पुणे : गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणीतील (Garwa Murder Case) आरोपी बाळासाहेब खेडकरचा आज मृत्यू झाला आहे. आरोपीवरती ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. येरवडा कारागृहात हा आरोपी बाळासाहेब खेडकर शिक्षा भोगत होता. 10 सप्टेंबर रोजी खेडकर याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला ससून रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

‘या’ प्रकरणी भोगत होता शिक्षा
उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्यावर 18 जुलै 2021 रोजी रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने वार केले होते. यामध्ये बाळासाहेब खेडेकर हा मुख्य आरोपी होता. त्याच्यासह 10 जणांवर या हत्येप्रकरणी 2021 मध्ये मोक्का लावण्यात आला होता. तेव्हापासून तो पुण्यातील येरवडा कारागृहात होता.

दोन दिवसापूर्वी त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारास त्याने योग्य प्रतिसाद न दिल्याने त्याची प्रकृती खालावत गेली. आज सकाळी ससून रुग्णालयात त्याचा मृ्त्यू झाला.

Share This News
error: Content is protected !!