Pune Video

Pune Video : कोंबडी पडली बिबट्यावर भारी; शिकार करायला गेला अन् स्वतःच अडकला जाळ्यात

335 0

पुणे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Pune Video) होताना दिसत आहे. यामध्ये एक कोंबडी बिबट्यावर भारी पडल्याचे दिसत आहे. हा बिबट्या कोंबडीची शिकार करायला गेला आणि स्वतःच खुराड्यात अडकला. ही घटना पुण्यातील जुन्नर या ठिकाणी घडली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका पिंजऱ्यात हा बिबट्या आहे, त्याच्यासोबत एक कोंबडीही आहे. पण तरी बिबट्या त्या कोंबडीची शिकार करत नाही. उलट तो त्या खुराड्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करताना दिसतो. त्यानंतर आणखी एका व्हिडीओत तो कोंबडीसोबत याच पिंजऱ्यात शांत बसलेला दिसत आहे.

कसा अडकला बिबट्या?
बिबट्या जसा खुराड्यात कोंबडीची शिकार करायला गेला, तसं शेतकऱ्यानं खुराड्याचं दार बंद केलं. त्यामुळे शिकारीसाठी आलेला बिबट्या स्वतःच अडकला. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. जुन्नर येथील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राच्या पथकाने खुराड्यात अडकलेल्या बिबट्याला भुलीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं आणि माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात पाठवला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dr.Jyoti Mete : डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

Nilesh Sable : नवा कॉमेडी शो सुरु होण्याआधी निलेश साबळेची ‘ती’ पोस्ट होते व्हायरल!

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 60 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

Uddhav Thackeray : आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो फडणवीसांनी शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!