मुंबई : राजकीय वर्तुळातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये ‘मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करेन आणि स्वत: दिल्लीच्या राजकारणात जाईन, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र, नंतर भाजपवाल्यांनी मलाच माझ्या लोकांसमोर खोटं पाडलं,’ असा गौप्यस्फोट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे.
‘शिवसेना-भाजपमध्ये उत्तम चाललं होतं. भाजपनं देश सांभाळावं, आम्ही महाराष्ट्र सांभाळू अशी सरळ विभागणी होती. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर, खासकरून अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर भाजप बदलला. त्यांना वाटलं आता आपण शिवसेनेला नामोहरम करू. पण मी ते होऊ दिलं नाही. वापरा आणि फेकून द्या ही त्यांची नीती आहे. 2019 मध्ये त्यांनी नेमकं हेच केलं, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण
Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट