पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये कडुस, (ता. खेड) येथील दक्षिणा फाऊंडेशन या खासगी प्रशिक्षण संस्थेत आयआयटी आणि नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या संस्थेतील 60 विद्यार्थ्याना जेवणातून विषबाधा झाली आहे. यापैकी 20 विद्यार्थ्याना उपचारासाठी चांडोली (राजगुरुनगर) ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन विद्यार्थी अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
काय घडले नेमके?
कडुस येथे दक्षिणा फाऊंडेशन संस्थेमार्फत आयआयटी आणि नीट परीक्षेची तयारी करून घेतली जाते. या ठिकाणी देशभरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याना शिक्षण तथा मार्गदर्शन केले जाते. या विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था संस्थेकडून केली जाते. या संस्थेमध्ये 18 ते 20 वयोगटातील जवळपास 600 विद्यार्थी, विद्यार्थीनी आहेत.
शुक्रवारी रात्री दुपारी राजमा आणि रात्री कांद्याची पात व बटाट्याची भाजी खाल्या नंतर शनिवारी पहाटे 2 नंतर मुलांना मळमळ, उलट्या होऊ लागल्या. यानंतर त्यांना तातडीने कडुस प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र मात्र २० विद्यार्थ्याना जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना चांडोली ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, निरिक्षक राजकुमार केंद्रे, उप निरिक्षक ज्ञानेश्वर राऊत,पोलिस संतोष घोलप , चांडोलीचे उपसरपंच सतीश सावंत, माजी उपसरपंच चिकाशेठ वाघमारे आदींनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची अपडेट घेतली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग
Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण
Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट