Vaishali Hotel

Vaishali Hotel : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचा वाद चिघळला; 4 वर्षांच्या मुलीला घेऊन पती बेपत्ता

50044 0

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली (Vaishali Hotel) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या हॉटेलचा (Vaishali Hotel) वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. हॉटेलच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी आता आपल्या पती विरोधात आरोप केले आहेत. चार वर्षाच्या मुलीला घेऊन पती मागील दोन महिन्यापासून बेपत्ता आहे, असा आरोप त्यांनी केला आहे, तसंच, मुलीला शोधून द्यावे आणि पतीला अटक करण्यात यावी, अशी मागणीदेखील निकीता शेट्टी यांनी केली आहे.

दोन महिन्यांपासून मी माझ्या मुलीचा चेहरादेखील पाहिलेला नाहीये. तिची आणि माझी भेट घडवावी, अशी विनंती मालक निकीता शेट्टी यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात गुन्हा दाखल असूनही पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याअगोदर हॉटेल वैशालीची पावर ऑफ अ‍ॅटर्नि बंदुकीचा धाक दाखवून आपल्या पतीनेच नावावर करून घेतल्याचा आरोप हॉटेलच्या मालकीण असलेल्या निकिता शेट्टी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हाही दाखल केला होता.

विश्वजीत विनायकराव जाधव, अभिजीत विनायकराव जाधव, विनायकराव जाधव आणि वैशाली गायकवाड जाधव यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता निकिता शेट्टी यांनी नवीन आरोप केल्याने पोलीस काय भूमिका घेतात त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!