पुणे : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. पोलिसांनी आता आरोपी विशाल अग्रवाल यांच्या घराची तपासणी केली. अग्रवाल यांनी चालकावर दबाव टाकला होता, त्यामुळे त्याने प्राथमिक माहितीमध्ये चुकीची माहिती दिली होती, असा खुलासा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.
काय केला खुलासा?
पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन तपासाबद्दल माहिती दिली. त्याआधी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्रकुमार अग्रवालच्या घरी तपास करण्यात आला. चालक गंगाराम पुजारी याला घेऊन घरी अपहरणाच्या गुन्ह्याची पाहणी करण्यात आली. ज्या दिवशी अपघाताची घटना घडली, त्या दिवशी रात्री ड्रायव्हरवर दबाव आणला होता. गुन्हा स्वतःच्या नावावर घ्या यासाठी अग्रवाल यांनी दबाव टाकला होता. रात्री साडे अकरा वाजता ड्रायव्हरला सोडल्यानंतर आरोपीने त्याला घरी नेलं. डांबुन ठेवलं होतं, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
दुसऱ्या दिवशी तो घरी आला नाही म्हणून त्याची बायको अग्रवाल यांच्या घरी गेली. तिथे तिने आरडाओरडाकरुन त्याला सोडवलं. या प्रकरणी आता अग्रवालच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल आणि सुरेंद्र अगरवाल यादोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात घडल्यानंतर ड्रायव्हरला आधी आमिष देखील दाखवण्यात आलं होतं.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव
Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी
Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक