Pune Police

Pune Police : पुणे पोलिसांची विशेष मोहीम ! रात्रभर गन्हेगारांची धरपकड; तब्बल ‘इतक्या’ गुन्हेगारांना केली अटक

342 0

पुणे : पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) विशेष मोहीम राबवून मध्यरात्री गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पोलिसांनी दीड हजार जणांची तपासणी केली. त्यामध्ये सव्वासातशे गुन्हेगार आढळले. त्यासोबतच वेगवेगळ्या भागातदेखील कारवाई करून 57 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

वाहनांची तोडफोड तसेच मारहाणीच्या घटना अधून-मधून घडत असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अचानक पोलिसांकडून गुन्हेगारांची तपासणीची कारवाई करण्यात येते. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. शहरातील गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

विशेष मोहिमेतील कारवाई
गुन्हे शाखेने गावठी दारू अड्डे उद्धवस्थ करून 6 गुन्हे दाखल, 21 हजारांचा ऐवज जप्त
स्थानिक पोलिसांकडून वेगवेगळ्या भागात 31 प्रकरणात जुगार साहित्य जप्त
महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार सहा तडीपार गुन्हेगारांवर कारवाई
शहरातील 388 उपाहारगृहे, ढाबे आणि लॉजची तपासणी
रेल्वे स्थानक, एसटी बसेसची पाहणी
नाकांबदी करून संशयित 1 हजार 227 वाहनांची तपासणी करून सव्वादोन लाखांचा दंड वसूल
वाहतूक शाखेने 999 वाहनांची तपासणी करून 2 लाख 12 हजारांची दंडात्मक कारवाई

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले नाही तर मी फाशी घेईन; ‘या’ आमदाराचे मोठे वक्तव्य

Shivadi Nhava Sheva Sea Link : शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवर ‘या’ गाड्यांना असणार बंदी

Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांनादेखील पोलिसांकडून अटक

Rohit Sharma : रोहित शर्मा रचणार इतिहास ! ‘हे’ 3 विक्रम मोडण्याची आहे संधी

Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वारांना धडक

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Share This News

Related Post

‘गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक करावे’

Posted by - February 26, 2022 0
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी पुणे- गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक असे करावे, अशी मागणी…
loksabha

Loksabha Election : पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ लोकसभा मतदारसंघांवर असणार साऱ्यांचं लक्ष

Posted by - May 31, 2024 0
पुणे : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार असून मतमोजणी ही 4 जून…

तीन वरिष्ठांना डावलून तुकाराम सुपे यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Posted by - February 21, 2022 0
पुणे- टीईटी गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले तुकाराम सुपे यांच्यावर मंत्रालयातील वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे मेहेरनजर होती अशी बाब पुढे आली आहे. तुकाराम…
Pune University Fight

Pune University : पुणे विद्यापीठात राडा; एसएफआय-अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

Posted by - November 1, 2023 0
पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन (Pune University) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *