पुणे : पुण्यात वाहतुकीसाठी पीएमपीएमएलचा (Pune PMPML) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामधून प्रवास करत असताना बसचालक अनेकदा अरेरावी किंवा गैरवर्तन करत असतात. अनेक वेळा हे बसचालक वाहतूक नियमांना पायदळी तुडवत असतात. यामुळे या अरेरावी करणाऱ्या चालकांवर चाप बसवण्यासाठी पीएमपीएमएलने (Pune PMPML) एक खास योजना आणली आहे. पीएमपीएमएलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ड्रायव्हर किंवा कंडक्टरची पुराव्यानिशी तक्रार केल्यास त्यांना 100 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
Bhimashankar Accident : भीमाशंकर-कल्याण बसला गिरवली गावाजवळ अपघात; 5 जण जखमी
काय आहे नेमकी योजना?
पुण्यात पीएमपीएमएलची सेवा सार्वजनिक वाहतूक सेवेचा कणा आहे. बहुतांश पुणेकर याच सेवेच्या प्रभावी वापर करत असतात. मात्र, प्रवास करत असतांना चालक आणि वाहक यांच्याकडून अनेकदा अरेरावी आणि वाहतूकीचे पालन केले जात नाही त्यामुळे याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेक तक्रारी करूनदेखील चालक आणि वाहक यांचा उद्दामपणा काही केल्या कमी झालेला नाही. यामुळे आता पीएमपीएमएल प्रशासाने ही खास योजना आणली आहे.अशा मुजोर आणि बेशिस्त ड्रायव्हर किंवा कंडक्टरची नागरिकांनी पुराव्यानिशी तक्रार केली तर त्यांना आता 100 रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.
Train Viral Video : महिलांची लोकल ट्रेनमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; लाथा- बुक्क्यांनी केली मारहाण
कशी कराल तक्रार?
ही तक्रार करण्यासाठी नागरिक सोशल मीडियाचा आधार घेऊ शकतात.गाडीचा तसेच चालकाचा फोटो किंवा व्हिडिओ घेऊन तो पोस्ट करू शकता. तसेच या संबंधीची तक्रार किंवा व्हिडिओ @ppml.org वर तसेच 9881495589 या व्हॉट्सअॅपवर बस क्रमांक, मार्ग, स्थळ, घटनेची तारीख आणि वेळ पाठवून तुम्ही आपली तक्रार दाखल करू शकता. वरती दिलेल्या गोष्टींची शहानिशा केल्यानंतर तक्रारदार नागरिकांना 100 रुपये बक्षीस दिले जाणार आहे. या योजनेमुळे बेशिस्त चालकांना चाप बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.