Vishal Mane

पुण्यात पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

5865 0

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) अंतर्गत असलेल्या भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये (Bhosari MIDC Police Station) कार्यरत असणारे पोलिस अंमलदार विशाल माने (Police Vishal Mane) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Of Policemen In Pimpri) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

विशाल माने यांची गुरूवारी साप्ताहिक सुट्टी होती. तेव्हा ते आपल्या काही मित्रांसह बाहेर फिरण्यासाठी गेले होते. यानंतर ते घरी परतले. आपल्या आईवडिलांशी बोलले. यानंतर ते आपल्या रूममध्ये गेले आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!